Thursday, January 19, 2017

Blog



 
१. उपलब्ध एक्सप्लोरमध्ये www.blogger.com वेबसाईट उघडा.
२. त्या पानावरील ' Creat your blog  now ' वर क्लिक करा.

३. आपल्याकडे जर ' gmail ' अकाउंट  नसेल तर इथे आपण नविन अकाउंट बनवू शकता आणि    'gmail ' अकांऊट असेल तर 'sign in first' या लिंक वर लॉगिन करा.

४. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर ' Sign up for Blogger ' चे पेजवर आपणास आपले नाव व ई-मेल पत्ता दिसेल. इथे 'Display Name' समोरील चौकोनात आपणास ज्या नावाने ब्लॉग सुरु करायचा असेल ते नाव द्या. मग  accept the terms of service ' पुढील चौकोनावर क्लिक करा. आता 'Continue ' वर क्लिक करा.

५. आता 'Name your Biog' चे पान उघडेल, त्यात 'blog title' च्या जागेमध्ये नविन ब्लॉगचे शिर्षक लिहा नंतर 'Blog address (URL)' पूढे आपल्या ब्लॉगचे नाव लिहा. 
http:// (या जागेमध्ये नाव लिहा) .blogspot.com 'Check Availability' वर क्लिक करा.
टिप :  'This blog address is availble' असा मॅसेज आला म्हणजे आपणास ज्या नावाने ब्लॉग हवा आहे ते नाव उपलब्ध आहे. ब्लॉगचे नाव देताना त्यामध्ये स्पेस (मोकळी जागा) देवू नये.
'पुढे 'CONTINUE' ह्या बटणावर क्लिक करा.

६. समोर ' Choose a template ' हे पान दिसेल. इथे आपण आपणास हव्या असलेल्या डिझाईनचा प्रकार निवडा व 'CONTINUE' ह्या बटणावर क्लिक करा (डिझाईन नंतर बदलू शकता.)

७. आता समोर ' Your blog has been created ! ' हे पान दिसेल याचा अर्थ आपला ब्लॉग तयार झाला आहे. आपल्याला हव्या असलेल्या कविता, कथा, माहिती, गोष्टी, घटना, इत्यादी आपल्या ब्लॉगवर लिहिण्यासाठी/ टाकण्यासाठी सुरुवात करण्यासाठी  'START POSTING' ह्या बटणावर क्लिक करा.

८. आता ' Posting ' चे पान उघडेल. त्या चौकोनामध्ये आपणास मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रमाणे बटणे दिसतील त्याचा वापर करुन त्या चौकोनामध्ये आपणास हवे असलेले साहित्य टाईप करा व खाली ह्या बट्णावर क्लिक करा व 'Title' समोर शिर्षक द्या.

९. आता आपले साहित्य आपल्या ब्लॉगवर येईल व आपल्या समोर ' Your blog post published successfully! ' हे पान उघडेल. या पानावर मोठ्या अक्षरामध्ये असलेल्या ' View Blog ' ह्या बट्णाच्या बाजूला असलेल्या '(in a new window)' ह्या लिंक वर क्लिक करा मग आपणास आपण टाईप केलेले साहित्य आपल्या ब्लॉगवर पाहता येईल.त्याच पानावरील 'Edit Post' बट्णावर क्लिक करुन आपल्या साहित्यामध्ये बद्ल करुन पुन्हा साठवू शकता अथवा 'Create a new Post' वर क्लिक करुन नविन साहित्य लिहू शकता.

१०. जर काही आपणास काही नविन माहिती पुन्हा द्यायची असल्यास पून्हा www.blogger.com लॉगिन केल्यास आपल्यासमोर आपल्या ब्लॉगची माहिती समोर दिसेल, ज्यामध्ये नविन माहिती देण्यासाठी, ब्लॉगची डिझाईन, आपली माहिती, जूनी माहिती डिलीट करण्यासाठी तसेच इतर गोष्टी करण्यासाठी लिंक्स दिसतील.